Ad will apear here
Next
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’
पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून २५० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यातील २० स्पर्धक अंतिम फेरीत पोहचल्या. यांतून मुळीक यांना ‘मिसेस महाराष्ट्र’ ही उपाधी मिळाली. इचलकरंजीच्या सौम्या पवार आणि पिंपरी-चिंचवडच्या अंजली चिंचवाडे अनुक्रमे फस्ट आणि सेंकड रनर अप बनल्या. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी रेश्मा सराफ यांनी कपडे डिजाईन केले होते, तर मेकअप सिम्ज यूनीसेक्स सॅलोनचा होता.

या प्रसंगी विचार व्यक्त करताना मुळीक म्हणाल्या, ‘मी खरोखरच आनंदी आहे की हे स्वप्न सत्यात उतरले आहे. माझे पालक, बहिण, मित्र आणि शुभचिंतकांच्या बिनशर्त प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.’
 
स्पर्धेला परीक्षक म्हणून ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल ग्रुमर’ हेमा कोतनिस, लाइफस्टाइल मॅगझिनच्या निशरीन पूनवाला, ‘मिसेस एशिया’ प्रियंका पोल, ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’ स्नेहा प्रहलादका उपस्थित होत्या. जॅझमाटाझ वर्ल्ड गत २५ वर्षांपासून याचे प्रायोजक आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXKBJ
Similar Posts
चौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी पुणे : विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत-तुर्कस्थान लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र या वेळी पराभवाचा सामना करावा लागला.
‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे ​रविवारी उद्घाटन पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन, पुणे महानगरपालिका, सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह, सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रीएटेड सोल्यूशन्स, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि गंगोत्री ग्रीन बिल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन सोसायटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गृह संस्था व पुणेकरांना या स्पर्धेत सहभागी होता येत येणार आहे
पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन पुणे : ‘हरिद्वार येथील सेवा शांतिकुंज परिवाराचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन ‘गायत्री परिवार’तर्फे करण्यात आले आहे. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे,’
‘वैचारिक क्रांतीसाठी ग्रंथसंपदा तरुणांपर्यंत पोहोचावी’ पुणे : ‘अवतीभोवती भौतिक सुविधा असल्या तरी, आज मानसिक शांतीचा अभाव दिसतो. अशावेळी पुस्तके आपल्या जीवनाला आधार देतात. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात भरकटत असलेल्या तरुणाईमध्ये वैचारिक क्रांती घडायची असेल, तर युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या साहित्यासारखी चांगली ग्रंथसंपदा तरुण पिढीपर्यंत पोहोचावी,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language